Belagavi

बेळगावमध्ये नव्या वर्षाचे स्वागत रक्तदान शिबीराने

Share

बेळगाव शहरात नव्या वर्षाच्या प्रारंभी कॅम्प येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगाव कॅम्प पोलीस स्थानकाच्या नजीकच्या हाय स्ट्रीट कॅम्प येथील तरुण आणि हिंद एज्युकेशनल अँड सोशल वेल्फेअर सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान करा, जीव वाचवा’ या स्पेशल टॅगलाइनखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी डॉ. समीर शेख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दरवर्षी १ जानेवारीला शिबिराचे आयोजन केले जाते. रक्तदात्यांना याचे फायदे कळावेत यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून रक्तदान एखाद्याचे जीवन वाचवू शकते. त्यामुळे तरुणांनी अधिकाधिक रक्तदान करून करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सेवा फाउंडेशनचे अकिब बेपारी यांनीही रक्तदानाचे महत्व पटवून दिले. दरवर्षी आयोजित करण्यात येणारे हे शिबीर अनेक ठिकाणी आयोजित करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

रक्तदान हे श्रेष्ठदान असे म्हटले जाते. अनेक रुग्णालयात रक्ताअभावी अनेक रुग्णांचे जीव जातात. यासाठी रक्तदान अत्यंत महत्वाचे आहे. अशा सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिरात प्रत्येकाने आणि विशेषतः तरुणांनी सहभागी होणे काळाची गरज आहे.

Tags: