Belagavi

पोलीस अधिकाऱ्यांनी एकमेकाला पुष्पगुच्छ देत दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा !

Share

 बेळगावात पोलीस अधिकाऱ्यांनी एकमेकाला पुष्पगुच्छ देऊन नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

होय, शिस्तीचे दुसरे नाव म्हणजे पोलीस खाते. स्वतःच्या सुखदुःखावर, सण-उत्सवांवर पाणी सोडून समाजाच्या सुखासाठी पोलीस दिवसरात्र धडपडतात. परंपरेप्रमाणे नववर्षाच्या शुभेच्छा देण्याची प्रथा पाळत पोलीस अधिकाऱ्यांनी आज बेळगावात फुरसतीचे काही क्षण घालवले.

आज नववर्षाला प्रारंभ झाल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगावातील उत्तर परिक्षेत्राचे आयजीपी एन. सतीशकुमार यांच्या क्लब रोडवरील गृहकचेरीत जाऊन परिक्षेत्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. बेळगावचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी, अपर पोलीस अधीक्षक अमरनाथ रेड्डी, लोकायुक्त एस. पी. यशोदा वंटगोडी, इंटेलिजन्स एस.पी., बेळगाव पोलीस आयुक्तालयाचे अधिकारी, तसेच उत्तर विभागातील विजापूर, बागलकोट, गदग, हावेरी, धारवाड आणि बेळगाव जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी आयजीपी सतीशकुमार यांना पुष्पगुच्छ देऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी केक कापून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. यावेळी ‘आपली मराठी’सोबत बोलताना आयजीपी सतीशकुमार आणि पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी राज्यातील समस्त जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. राज्यात सर्वत्र सुख, शांती, समृद्धी नांदू दे अशी प्रार्थना त्यांनी केली.

एकंदर २०२१मध्ये जगात सगळ्यांनीच कोरोना संकटामुळे अनेक अडचणी, संकटांचा सामना केला. किमान २०२२ या नव्या वर्षात तरी या अडचणी, संकटे संपू देत आणि नवीन वर्ष सुख-समाधानाचे जावो अशाच शुभेच्छा आपण या निमित्ताने एकमेकांना देऊ.

 

 

 

Tags: