Vijayapura

मुख्याध्यापकांविरोधात विद्यार्थी उतरले रस्त्यावर!

Share

शाळेतील विद्यार्थ्यांसोबत अर्वाच्च भाषा वापरल्याचा निषेध करत मुख्याध्यापकांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन छेडल्याची घटना विजापूर मधील तिकोटा येथे घडली आहे.

विजापूर जिल्ह्यातील तिकोटा या तालुक्यातील होनवाड गावातील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना अर्वाच्च शब्द वापरण्यात आल्याचा आरोप करत विजापूर – अथणी राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन छेडण्यात आले.

मागील एक आठवड्यापासून हा प्रकार घडत असून सहशिक्षकांना देखील किरकिर करण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून माध्यान्ह आहार देखील बनविण्यात आला नाही असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. जेवण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची रवानगी घरी करण्यात आली असून सरकारी निधीचा दुरुपयोग करण्यात येत असल्याचेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या शाळेच्या मुख्याध्यापकांची बदली करण्यात यावी अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान यावेळी तिकोटा पोलिसांनी आंदोलन स्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून समजूत काढली.

Tags: