COVID-19

महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना

Share

महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काल अधिवेशनात वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. अनेक मंत्री त्यांच्या संपर्कात आल्याचे देखील कळते आहे. त्यामुळे अधिवेशाच्या शेवटच्या दिवशी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्षा गायकवाड यांनी स्वत: ट्विट करत कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्यांना आपली कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

काल विधान परिषदेत वर्षा गायकवाड यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी शिक्षण विभागासंबंधी भाष्य देखील केले होते. त्यावेळी सभागृहाच्या जवळपास सर्वच आमदारांच्या संपर्कात गायकवाड आल्याचे कळते. यापुर्वी देखील हिवाळी अधिवेशनात सुमारे 36 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यात आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी, भाजप आमदार समीर मेघे यांना कोरोना लागण झाली होती.

हिवाळी अधिवेशनादरम्यान आतापर्यंत सुमारे 36 जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आजपासून रोज कोरोना चाचणी केली जाईल असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

Tags: