Gokak

काँग्रेस स्थापना दिनानिमित्त गोकाक येथे रक्तदान शिबीर

Share

काँग्रेसने देशासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. स्वातंत्र्य काळापासून राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत देशाच्या विकासासाठी काँग्रेसने अथक परिश्रम घेतले आहेत, असे विधान काँग्रेस युवा नेते राहुल जारकीहोळी यांनी केले.

 गोकाक चन्नबसवेश्वर विद्यापीठाच्या प्रांगणात काँग्रेसच्या १३७ व्य संस्थापन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. स्थापना दिनाच्या औचित्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात ५० हून अधिक जणांनी सहभाग घेतला.

यावेळी केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, प्रियांका जारकीहोळी आणि राहुल जारकीहोळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वातंत्र्यकाळापासून काँग्रेसने राजकीय, आर्थिक, सामाजिक विकासात योगदान दिले आहे. पक्षाच्या स्थापना दिनाचा एक भाग म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणांनी अधिकाधिक रक्तदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी काँग्रेस नेते विवेक जत्ती, मारुती विजयनगर, कल्लाप्पा गौडा लक्कार, बसनगौडा होळाच्ची, राहुल बडेसगोळ, शिवलिंग कोटबागी, मुन्ना खतीब, मंजुळा रामगानट्टी, मारुती विजयनगर तसेच काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: