Gokak

गोकाकमध्ये शतायुषी आजीबाईंचा तुलाभार

Share

पिझ्झा, बर्गर आणि फास्टफूडच्या जमान्यात आज प्रत्येकाने आपले आरोग्य पणाला लावले आहेपरंतु अनेक वर्षांपासून सकस आणि आरोग्यपूर्ण आहारासोबत शतायुषी झालेल्यांची संख्याही कमी नाही. गोकाक तालुक्यातील अशाच एका आजीबाईंनी नुकतीच वयाची १०६ वर्ष गाठली आहेतया निमित्त त्यांचा तुलाभार करण्यात आला आहेपाहुयात त्यांच्याबद्दलचा हा विशेष रिपोर्ट

पूर्वापार चालत आलेल्या परंपरांना फाटा देत आज धावपळीच्या जीवनात इन्स्टंट फूडच्या मागे धावत अनेकांनी आपले आरोग्य बिघडून घेतले आहे. या धावपळीच्या जीवनात घरगुती, शुद्ध जेवणाचा विसर बहुतांशी साऱ्यांनाच पडला आहे. ग्रामीण भागात आजही या परंपरा आणि जीवनशैली जपण्यात येत आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे गोकाक तालुक्यातील सावळगी या गावातील बाळव्वा बसाप्पा मगदूम या आजीबाई… आपल्या घरगुती आणि आरोग्यपूर्ण आहार आणि जीवनशैलीच्या माध्यमातून या आजीबाईंनी आपल्या वयाची १०६ वर्षे गाठली आहेत.  (फ्लो) इतकेच नाही तर गावातील अनेक लहान – मोठ्यांमध्ये असलेल्या आजारांवर आपल्या बटव्यातून त्यांनी अनेक उपाय करून कित्येकांचे आजार दूर केले आहेत. त्यांचे वय शंभरी पार केलेले जरी असले तरी आजतागायत मगदूम कुटुंबामध्ये त्यांना आणि त्यांच्या शब्दांना तितकाच मान आहे. मगदूम कुटुंबातील प्रत्येक निर्णयात त्यांचे मत हे महत्वाचे मानले जाते.

वयाच्या १०६ वर्षात देखील आजीबाई आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची आपुलकीने काळजी घेतात. प्रत्येकाच्या तब्येतीची वेळोवेळी विचारपूस करून आपले प्रेम व्यक्त करतात. सावळगी, नांदगाव, खानापूर, मुत्नाळ आदी गावांमध्ये कोणत्याही कार्यक्रमासाठी आजीबाईंना विशेष आमंत्रण दिले जाते. अशा या आजीबाईचा सावळगी येथील श्री जगद्गुरू श्री शिवलिंगेश्वर कुमारेंद्र महास्वामी यांच्या उपस्थितीत तुलाभार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या तुलाभार कार्यक्रमात आजीबाईंच्या संपर्कात असलेल्या हजारो जणांनी सहभाग घेतला होता. या तुलाभार कार्यक्रमाच्या निमित्ताने मगदूम कुटुंबियांच्या वतीने जेवणाची सोय करण्यात आली होती. यावेळी स्वामीजींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

आजच्या धावपळीच्या युगात माणसाचे आयुष्य जास्तीत जास्त ५० ते ६० वर्षे इतकेच आहे. जीवनशैली, संतुलित आहार, व्यायाम आणि स्पर्धेच्या मागे धावत मानसिक संतुलन योग्य ठेवून निरोगी आणि दीर्घायु होण्यासाठी आजीबाईंच्या उदाहरण मात्र आदर्शवत आहे.

 

 

 

Tags: