COVID-19

ओमीक्रॉनच्या वाढत्या संसर्गाची चिंता : मुख्यमंत्री

Share

महाराष्ट्र, केरळसह तामिळनाडूमध्येही ओमीक्रॉनचा धोका वाढला असून या पार्श्वभूमीवर बेंगळूरमध्ये तज्ज्ञ समितीशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.

हुबळी येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. बेंगळूरमध्ये तातडीची बैठक घेण्यात येणार असून पुढील उपाययोजना आणि निर्णय घेण्यात येणार असून नव्या वर्षाच्या स्वागतासंदर्भात तज्ज्ञ समितीशी चर्चा करून निर्णय कळविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

विधानसभा अधिवेशनादरम्यान विरोधकांनी सभापतींचे भान न ठेवता केलेल्या प्रकारचा मी निषेध व्यक्त करत असून घडल्या प्रकारामुळे सभापती राजीनामा देण्यासाठी पुढारले. यावेळी त्यांची मनधरणी करून त्यांची समजूत काढण्यात आली, असे मुख्यमंत्री म्हणाले.

परदेशात शास्त्रचिकित्सेच्या नियोजनासंदर्भात प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले, कि डावोस शिखर परिषदेच्या निमित्ताने नियोजन करण्यात आले होते. परंतु हि परिषद आता जून महिन्यात आयोजित केली असून सध्या कोणत्याही कारणास्तव विदेशदौरा नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

ओमीक्रॉनच्या वाढत्या संसर्गाची चिंता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली असून यासाठी बेंगळूरमध्ये तातडीची बैठक बोलावून पुढील मार्गसूची ठरविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Tags: