बेंगळुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे तीव्र पडसाद कोल्हापुरातही उमटले. शिवसैनिकांनी कर्नाटक पासिंगच्या वाहनांना काळे फासून, कन्नड व्यापाऱ्यांची कोल्हापुरातील दुकाने बंद पाडली.

कोल्हापूर शहराबाहेरील राष्ट्रीय महामार्गावरील तावडे हॉटेलजवळ शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा अनोखा निषेध नोंदवला. शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कर्नाटक पासिंगच्या वाहनांना काळे फासले.
शुक्रवारी रात्री शिवसैनिकांनी कन्नडीगांची कोल्हापूरातील दुकाने बंद पाडत कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध नोंदवला. तसेच हर्षल सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करून शिवमूर्तीला अभिषेक घातला.विजय दरवान, प्रणव पाटील, प्रदीप हांडे, शुभम जाधव, यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन पार पडले.—-
Recent Comments