Gokak

प्रियकराच्या घरासमोर प्रेयसीचे धरणे आंदोलन!

Share

विविध मागण्यांसाठी राजकारणी, समाजकारणी यासारखे अनेक लोक आंदोलन करताना नेहमीच दिसतात. परंतु गोकाक तालुक्यातील अरभावी येथे एका प्रेयसीने चक्क प्रियकराच्या घरासमोर धरणे आंदोलन केल्याची घटना समोर आली आहे. प्रियकर आणि त्याच्या घरच्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप प्रेयसीने केला आहे.

काहीशी अजब आणि गोंधळात टाकणारी हि घटना असून याप्रकरणातील मौनेश बडिगेर नामक प्रियकराने गीता या घटस्फोटित प्रेयसीशी लग्न केले. दरम्यान प्रेयसीची जात वेगळी असल्याने प्रियकराच्या कुटुंबीयांनी तिला घरी राहण्याची परवानगी दिली नसल्याने सदर प्रेयसीने चक्क प्रियकराच्या घरासमोर ठाण मांडून गेल्या दोन दिवसांपासून धरणे आंदोलन छेडले आहे.

चार वर्षांपूर्वी विवाह झालेल्या गीता नामक युवतीशी अरभावीच्या मौनेश बडिगेर या व्यक्तीशी परिचय झाला. यानंतर काही दिवसातच हे प्रकरण लक्षात आल्यानंतर गीताच्या पतीने घटस्फोट दिला. तीन महिन्यांपूर्वी अरभावी येथील मौनेश बडिगेर याच्याशी बैलहोंगल येथील सोगल येथे दोघे विवाहबद्ध झाले. ज्येष्ठांच्या साक्षीने मौनेशने गीताशी विवाह केला. परंतु काही दिवसानंतर गीताची जात वेगळी असल्याकारणाने मौनेशच्या कुटुंबीयांनी तिला त्रास देण्यास सुरु केला. यानंतर गीतासाठी मौनेशच्या घरचे दरदेखील बंद करण्यात आले. याविरोधात आता गीताने चक्क मौनेशच्या घरासमोर धरणे आंदोलन छेडत आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. शिवाय जोवर आपला प्रियकर आपल्यासोबत येत नाही तोवर या जागेवरून आपण हलणार नसल्याचे गीताचे म्हणणे आहे. दरम्यान याठिकाणी पोलिसांनी देखील भेट देऊन धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे घटस्फोट, एकीकडे प्रियकर आणि एकीकडे पोलीस अशा चारी बाजूंनी हि प्रेयसी अडचणीत आली आहे.

Tags: