Gokak

विधान परिषद निवडणुकीतील ‘ती’ २ मते बाद !

Share

अटीतटीच्या विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. परंतु निवडणुकीची गोपनीयता राखल्याबद्दल दोन सदस्यांची मते बाद ठरवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे

होय, चिक्कोडीतील आरडी हायस्कुलमध्ये आज सकाळी विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला प्रारंभ झाला. मात्र मतदानाची गोपनीयता भंग केल्यावरून मतमोजणीपूर्वीच २ सदस्यांची मते बाद ठरविण्यात आली आहेत. याबाबत राजकीय पक्षांच्या एजंटना जिल्हा निवडणूक अधिकारी आर. व्यकंटेशकुमार यांनी माहिती दिली.

बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील बंडीगवाड ग्रामपंचायत मतदान क्र. २५० वर मतदानावेळी गोपनीयता पाळली नसल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबत बंडीगवाड ग्रामपंचायतीच्या २ सदस्यांविरोधात घटप्रभा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. निवडणूक एजंटांना मतपत्रिका दाखवून या सदस्यांनी मतदान केल्याने निवडणूक गोपनीयतेचा भंग झाला होता. त्यामुळे निवडणूक एजंट, निवडणूक कर्मचाऱ्यांच्या समक्षच ही २ मते बाद ठरविण्यात आली.

 

Tags: