Chikkodi

आरडी हायस्कुलला पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांची भेट

Share

विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी होणार असलेल्या चिक्कोडीतील आरडी हायस्कुलला जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.

बेळगाव जिल्हा स्थानिक स्वराज संस्था विधान परिषद मतदार संघांतील निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी, १४ डिसेंबरला चिक्कोडीतील आरडी हायस्कुलमध्ये होणार आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रातून आणलेल्या मतपेट्या येथील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. हायस्कुल परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.  फ्लो

यावेळी अपर जिल्हा पोलीस अधीक्षक अमरनाथ रेड्डी, डीवायएसपी मनोजकुमार नाईक, सीपीआय आर. आर. पाटील आदी उपस्थित होते.

 

Tags: