विजेचे थकीत बिल भर असे सांगितल्याचा रागातून एकाने हेस्कॉमच्या लाईनमनवर हल्ला करून धमकी दिल्याची घटना विजापूर शहरातील गॅंगवाडी भागात घडली.

व्हॉईस ओव्हर : विजापूर शहरातील गॅंगवाडी भागातील नेहरूनगर येथील रहिवाशी ३२ वर्षीय मोहम्म्दरफिक बुडनसाब बडेकार असे हल्लेखोराचे नाव आहे. त्याचे २ हजारहून अधिकचे वीजबिल थकीत होते. ते भर म्हणून सांगण्यास गेलेला हेस्कॉमचा लाईनमन ३१ वर्षीय बाळप्पा मल्लप्पा बोम्मनगी हा गेला होता. त्यावेळी मोहम्म्दरफिकने त्याच्याशी वाद घातला. त्यावेळी वाद वाढला आणि मोहम्म्दरफिकने बाळप्पावर हल्ला करून धमकी दिली. याबाबत गांधीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.



Recent Comments