भरधाव मोटरसायकल घसरून झालेल्या अपघातात तरुण पोलिसांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना गोकाक तालुक्यातील बेनचनमर्डी गावाजवळ आज सकाळी घडली.

२४ वर्षीय पोलीस शिपाई आनंद लगमाप्पा सुलधाळ असे मृताचे नाव आहे. आनंद हे गोकाक शहर पोलीस ठाण्यात सेवा बजावीत होते. काल रात्रीची गस्त आटोपून आज बुधवारी सकाळी ५.३० च्या सुमारास ते मोटारसायकलवरून घरी परतत असताना बेनचनमर्डी गावाजवळ करेमम्मा देवस्थानजवळ त्यांची मोटरसायकल घसरून ते पडले. यावेळी डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाल्याने ते जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच अंकलगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अक्कतंगेरहाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवून दिला. अंकलगी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. FLOW


Recent Comments