COVID-19

विजापूरमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव : दोन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह

Share

विजापूर शहरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याची चिन्हे दिसत असून आज दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश घेतलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही रुग्णांमध्ये आजाराची कोणतीही लक्षणे नसून दोघांचे रिपोर्ट्स मात्र पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही रुग्णांना होम आयसोलेटेड करण्यात आले असून पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाल्याच्या भीतीने चेकपोस्टवर कडेकोट तपासणी करण्यात येत आहे. १९ नोव्हेंबर नंतर या दोघांना कोरोनाची लागण झाली असून विजापूरमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Tags: