कार्तिकी अमावास्येच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गुड्डापूर येथे शिवशरण श्री दन्नम्मा देवीची पदयात्रा सुरु होते. या भक्तांसाठी अनेक प्रकारच्या सेवा पार पाडण्याचे कार्य केले जाते. याचाच एक भाग म्हणून इन न्यूजच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून या भक्तासाठी अन्नप्रसादाचे वाटप करण्यात आले.

व्हॉइस : कार्तिकी अमावास्येनिमित्त सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गुड्डापूर येथे शिवशरण श्री दन्नम्मा देवीची पदयात्रा मोठ्या उत्साहात भक्तांकडून राबविली जाते. या यात्रेत कर्नाटकासह महाराष्ट्रातील अनेक भक्त सहभागी होतात. मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हि पदयात्रा स्थगित करण्यात आली होती. तसेच यंदा ओमीक्रॉन च्या सावटाखाली हि यात्रा पार पडत आहे. पदयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांसाठी इन् न्यूज च्या माध्यमातून अन्नप्रसादाचे आज वाटप करण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या यात्रेकरूंसाठी केळी वाटप केले जाते. दानम्मा देवीचा कृपाशिर्वाद असाच राहूदे, सर्वांना उत्तम आरोग्य आणि ऐश्वर्य मिळूदे अशी प्रार्थना भक्तांकडून करण्यात येते. त्यामुळे या उत्सवात सहभागी झालेल्या भक्तांसाठी फळांचे वाटप करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया येथील एका पण विक्रेत्याने दिली. या पदयात्रेत सहभागी झालेल्या भक्तांनी फळवाटप करणाऱ्या भाविकांचे यावेळी आभार मानले.


Recent Comments