बेळगावातील महाद्वार रोडवरील पाचव्या क्रॉसवर भरविण्यात आलेल्या जुगारी अड्ड्यावर मार्केट पोलिसांनी छापा टाकून जुगारात लावलेली तब्बल एक लाखांहून अधिक रक्कम व साहित्य जप्त केले. याप्रकरणी ९ जुगाऱ्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

होय, बेळगावातील महाद्वार रोडवरील पाचव्या क्रॉसवर जुगार अड्डा भरविण्यात आल्याची पक्की खबर मार्केट पोलिसांना मिळाली. त्यानुसार मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी व निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने सापळा रचून त्याठिकाणी छापा टाकला. या छाप्यात ९ जुगाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. त्याशिवाय जुगारात लावलेली १,०३,४४० रुपये व साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.



Recent Comments