विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जारकीहोळी ब्रदर्स मध्ये पुन्हा वाकयुद्ध सुरु झाले आहे. सतीश जारकीहोळी यांनी लखन जारकीहोळींच्या संदर्भात ‘बी-टीम’ म्हणून केलेल्या विधानाला लखन जारकीहोळींनी प्रत्त्युत्तर दिले असून आपली टीम नेहमीच ‘ए’टीम’ असल्याचे ते म्हणाले आहेत.

बेळगाव तालुकयातील सुळेभावी येथे अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी ते बोलत होते. जे कोणी ए टीम , बी टीम म्हणून बोलत आहेत, त्यांना आपण सांगू इच्छितो, कि आपली टीम नेहमी ए टीम आहे. ए फॉर ए वन… आमची ए टीम आणि त्यांची बी टीम… मतदार आमच्याकडे ए टीम म्हणून पाहतात. इतरांची बी..सी… टीम असेल, अशा शब्दात सतीश जारकीहोळींना लखन जारकीहोळी यांनी टोला लगावला आहे.

निवडणुकीत काही अनुचित घटना घडत असल्याच्या काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, दुसऱ्याच्या तोंडावर शाई फेकणाऱ्यांना आधी स्वतःचे हात शाईत बुडवावे लागतात. मी कोणावरही आरोप करणार नाही. सतीश जारकीहोळी पोलिंग बूथ चे एजंट आहेत का? या प्रसारमाध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना लखन जारकीहोळी म्हणाले, याचा कोणताच फायदा होणार नसून मतदार हे सर्वस्व असल्याचे ते म्हणाले.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकारण रंगत चालले असून दोन्ही नेत्यांमधील वाक्युद्ध दिवसेंदिवस वाढत चालले असल्याचे निदर्शनात येत आहे. ए टीम, बी टीम… या विधानावरून सुरु असलेला उभयतांमधील वाद कोणत्या वळणावर येऊन शांत होईल, किंवा यातून आणखी आरोप प्रत्यारोप करण्यात येतील, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.


Recent Comments