ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांनुसार राज्यातील सर्व विमानतळांवर येणाऱ्या प्रवाशांची सक्तीने आरटीपीसीआर कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले.
ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची सक्तीने आरटीपीसीआर कोरोना चाचणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे बुधवारी आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी विमानतळाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री सुधाकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांनुसार राज्यातील सर्व विमानतळांवर येणाऱ्या प्रवाशांची सक्तीने आरटीपीसीआर कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. याबाबत आरोग्य खात्याच्या मुख्य सचिवांनाही सूचना देण्यात आली आहे. चाचणी सक्तीमुळे प्रवाशांना काही काळ विलंब होऊ शकेल. मात्र ओमीक्रॉनचा खात्मा करेपर्यंत सरकारला सहकार्य करा असे आवाहन त्यांनी केले.
उद्या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. आरोग्य खात्याच्या फ्रंटलाईन वॉरियर्सनी लसीचे डोस घेऊन ७-८ महिने झाले आहेत. त्यातील काहींची रोग प्रतिकारक शक्ती कमी झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे त्यांना तिसरा डोस किंवा बूस्टर डोस देण्यासंदर्भात मुख्यमंत्री केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. बूस्टर डोस देण्यास केंद्राने मंजुरी दिली तर त्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येईल असे सुधाकर यांनी सांगितले.
डॉ. सुधाकर म्हणाले, राज्यात क्वारंटाईन, होम क्वारंटाईन ऍप, टेलिमेडिसिन, टेस्ट्स वाढविल्या आहेत. सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरण्यासह सर्व उपाय करण्यात येतील. त्यामुळे लोकांनी सर्व प्रकारचे प्रतिबंधक उपाय योजावेत. ओमीक्रॉनचा खात्मा करेपर्यंत सरकारला सहकार्य करा असे आवाहन त्यांनी केले.
एकंदर, ओमीक्रॉनचा खात्मा करेपर्यंत सरकारला सहकार्य करा असे आवाहन आरोग्यमंत्री सुधाकर यांनी केले.
Recent Comments