बेंगळूर येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय रोलर स्केटिंग चॅम्पिअनशिपमध्ये बेळगावच्या स्केटिंगपटूंनी तब्बल ३३ पदके जिंकून बेळगावच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे.

होय, कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने बेंगळुरात सिटी स्केटर्स ट्रॅक आणि कस्तुरीनगरातील ट्रॅकवर २५ ते २८ नोव्हेंबरपर्यंत राज्यस्तरीय रोलर स्केटिंग चॅम्पिअनशिपचे आयोजन केले होते. या स्पर्धेत बेळगावच्या स्केटर्सनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्यांनी १८ सुवर्ण, ३ रौप्य आणि १२ कांस्य पदकांसमवेत एकूण ३३ पदके प्राप्त केली आहेत.

वेगवान स्केटिंग, फ्री स्टाईल स्केटिंग, ऑफलाईन स्केटिंग, इनलाईन स्केटिंग, हॉकी आणि रोलर स्केटिंग अशा विविध प्रकारांत हि स्पर्धा घेण्यात आली. त्यात ३३ पदके जिंकून बेळगावच्या स्केटिंगपटूंनी कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे.


Recent Comments