बेळगाव टेबल टेनिस अकादमीच्या नूतन बालाजी टेबल टेनिस हॉलचे बुधवारी सकाळी शानदार समारंभात उदघाटन करण्यात आले.

बेळगावातील टिळकवाडीतील बुधवारपेठेतील बेळगाव टेबल टेनिस अकादमीच्या नूतन बालाजी टेबल टेनिस हॉलचे उदघाटन मेट्रोकास्ट नेटवर्क इंडिया प्रा. लि. चे चेअरमन नागेश छाब्रिया यांच्याहस्ते आज सकाळी करण्यात आले. फ्लो यावेळी बोलताना अकादमीचे संजय बिरंजे म्हणाले, बेळगाव टेबल टेनिस अकादमीकडून टेबल टेनिसला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. आज अकादमीच्या नूतन बालाजी टेबल टेनिस हॉलचे उदघाटन मेट्रोकास्ट नेटवर्क इंडिया प्रा. लि. चे चेअरमन नागेश छाब्रिया यांच्याहस्ते झाले ही आनंदाची बाब आहे. यासाठी सहकार्य दिलेल्या आणि उपस्थित मान्यवरांचे त्यांनी आभार मानले. 

हॉलचे उदघाटन करून बोलताना मेट्रोकास्ट नेटवर्क इंडिया प्रा. लि. चे प्रमोटर नागेश छाब्रिया म्हणाले, मी स्वतःही टेबल टेनिसपटू आहे. त्यामुळे हॉलचे उदघाटन करण्याची संधी मिळाली याचा आनंद झाला. अकादमीच्या टेबल टेनिसला प्रोत्साहन देण्याच्या सर्व उपक्रमांसाठी सहकार्य देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी प्रशिक्षक राघवेंद्र रायकर, समर्थ मंदिरचे ट्रस्टी गोविंद फडके, नारायण पै, प्रशांत शानभाग, गणपती पै, वरद पै, कृष्णानंद कामत, जेबी फौंडेशनचे राष्ट्रीय टेबल टेनिसपटू मायव्वा संगीनांवर, बसप्पा शिंदोळी आदी उपस्थित होते.


Recent Comments