Vijayapura

प्रा. सुनीलकुमार यादव यांना ‘हिंदी भूषण श्री’

Share

विजापुरातील विध्यावर्धक संघाच्या दरबार कला, वाणिज्य आणि बीसीए महाविद्यालयाचे हिंदीचे प्रा. सुनीलकुमार यादव यांनाहिंदी भूषण श्रीपुरस्काराने गौरविण्यात आले.

विजापुरातील विध्यावर्धक संघाच्या दरबार कला, वाणिज्य आणि बीसीए महाविद्यालयाचे हिंदीचे प्रा. सुनीलकुमार यादव यांना उत्तर प्रदेशातील के बी न्यासने सातव्या आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार सोहळ्यात ‘हिंदी भूषण श्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘कर्नाटक में हिंदी की स्थितिगति’ या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भोपाळ येथील अटलबिहारी वाजपेयी हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. खेमसिंह डहेरिया, न्यासचे अध्यक्ष सत्य हरिश्चंद्र शर्मा, प्रसिद्ध हिंदी साहित्यिक व कवी रामसहेनी हिरालाल शर्मा यांच्याहस्ते प्रा. यादव याना गौरविण्यात आले.

Tags: