COVID-19

बेळगावात जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा

Share

पदवीधर शिक्षण विभाग बेळगाव आणि सरस्वती सरकारी कन्या पदवीपूर्व महाविद्यालय, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

बेळगाव शहरातील शहापूर येथील सरस्वती सरकारी कन्या पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्रांगणात जिल्हास्तरीय पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेचे आयोजित करण्यात आले आहे. या माध्यमातून घेण्यात आलेल्या कराटे स्पर्धेत १०० ते १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

यासंदर्भात बोलताना सरस्वती पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एम. हुन्नूर म्हणाले, बेळगाव जिल्ह्यातील पदवीपूर्व शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांसाठी कराटे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून विविध महाविद्यालयातील सुमारे २०० हुन अधिक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. सर्व विद्यार्थ्यांनी हि स्पर्धा उत्तमप्रकारे पार पाडल्याचे त्यांनी सांगितले. (बाईट)

या प्रसंगी बोलताना, बेळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रभू शिवनायकर म्हणाले पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी सीईटीमध्ये क्रीडा विभागात आरक्षण देण्यासाठी संचालकांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले असून सर्व विद्यार्थ्यांनी कोविड नियमांचे पालन करावे, अशी सूचना त्यांनी दिली. (बाईट)

यावेळी बोलताना जिल्हा कराटे असोसिएशनचे सचिव जितेंद्र काकतीकर म्हणाले की, जिल्हास्तरीय कराटे क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेत हिरीरीने सहभाग घेतला असून स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी कोविड मार्गसूचीचे पालन कसे करावे, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. (बाईट)

यावेळी जितेंद्र काकतीकर, रमेश अलगुडकर, गजेंद्र काकतीकर, प्रभू शिवनायकर, जी. एन. पाटील, डॉ. अमित जडे, प्रदीप जुवेकर आदी उपस्थित होते.

Tags: