COVID-19

ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात संपूर्ण खबरदारी : मुख्यमंत्री

Share

परदेशात ओमीक्रॉन हा कोरोनाचा नवा विषाणू आढळल्यानंतर जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार कर्नाटकात खबरदारीचे उपाय योजण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

 

तुमकूर येथील सिद्धगंगा मठाला मुख्यमंत्री बोम्मई यांनी सोमवारी भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठी खबरदारी घेण्यात येत आहे. जेथे कोरोनाची बाधा झाली आहे तेथे कंटेनमेंट झोन बनवून बाधितांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. बाधितांच्या, लक्षणे आढळलेल्यांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. काही प्रकरणात सॅम्पल्स जीनोम टेस्टला पाठवण्यात येत आहेत. बाधितांमधील विषाणू डेल्टा आहे का ओमीक्रॉन याचा शोध घेण्यात येत आहे असे बोम्मई म्हणाले.

राज्यातील विमानतळांवर आदिक सतर्कता बाळगण्यात येत असल्याचे सांगून बोम्मई म्हणाले, विमानाने येणाऱ्या प्रवाशांचा सवाल कोरोना निगेटिव्ह असेल तरच त्यांना प्रवेश देण्याचा कठोर निर्णय सरकारने घेतला आहे. केरळमधून येणाऱ्यांवर तीव्र निगराणी ठेवण्यात येत आहे. केरळचे विध्यार्थी, नर्सिंग स्टाफ राज्यात सर्वत्र आहेत. त्यामुळे सर्वच जिल्ह्यांत सावधगिरी वागण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळा-महाविद्यालयांवरही सरकार बारीक नजर ठेवून आहे. जेथे विध्यार्थी अधिक संख्येने जमतात त्या ठिकाणी कोविड नियमावलीचे काटेकोर पालन करण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत असे बोम्मई म्हणालेअवकाळीने केलेल्या पीक नुकसानीच्या भरपाईसंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले, ६८५ कोटी रुपयांचा निधी सर्व जिल्हा प्रशासनांकडे दिला आहे. काही जिल्ह्यांत पीक नुकसानीची माहिती परिहार ऍपवर अपलोड करताच भरपाई दिली आहे. राज्याच्या अर्थखात्याने केंद्रीय आपत्ती निवारण सचिवांना भरपाई निधीबाबत पत्र लिहिले आहे. मीसुद्धा केंद्राला पत्र लिहून तातडीने आपत्ती अध्ययन पथक राज्यात पाठवून देण्याची विनंती केली आहे. राज्य सरकारकडूनही पीक नुकसानीचा आढावा घेण्यात येत आहे. हे सर्वेक्षण संपताच केंद्र सरकारला सविस्तर अहवाल पाठवून देण्यात येईल असे बोम्मई यांनी सांगितले.   एकंदर, ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सरकार राज्यात संपूर्ण खबरदारी घेत असल्याचे बोम्मई यांनी यावेळी सांगितले.

Tags: