भरधाव मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलचालक जागीच ठार झाला. ही दुर्घटना बुधवारी विजापुरात जिल्हा इस्पितळासमोर घडली.

विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ येथील रहिवासी इरय्या अडिवय्या पाटील असे मृत मोटारसायकलचालकाचे नाव आहे. मुद्देबिहाळहुन कामासाठी विजापूरला जाताना जिल्हा इस्पितळासमोर त्याचे वेगामुळे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हा अपघात झाला. विजापूर शहर वाहतूक पोलिसात दुर्घटनेची नोंद झाली आहे.



Recent Comments