Gokak

प्रवचन देत असतानाच हृदयविकाराने स्वामीजींचे निधन

Share

प्रवचन देत असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने एका स्वामीजींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गोकाक तालुक्यात घडली आहे. उशिराने ही घटना उघडकीस आली असून, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

होय, ६ नोव्हेंबर रोजी आपलाच वाढदिवस साजरा करून भक्तांसमोर प्रवचन सादर करताना ५३ वर्षीय संगनबसव स्वामीजींना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. मृत संगनबसव स्वामीजी गोकाक तालुक्यातील बळोबाळ गावच्या बसवयोग मंडप ट्रस्टच्या बळोबाळ मठाचे स्वामीजी होते. ६ नोव्हेंबर रोजीच त्यांचा वाढदिवस होता. त्याचदिवशी भक्तांसमोर प्रवचन देत असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेचे दृश्य भक्तांच्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झाले असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

 

Tags: