ईपीएस निवृत्तिवेतनधारकांना दरमहा ३ हजार रुपये पेन्शन द्यावी, पेन्शनसह डीए देण्यासाठी भगतसिंह कोशारी अहवाल लागू करावा या मागण्यांसाठी बेळगावात पेन्शनरांनी निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

किमान ३ हजार रुपये निवृत्तीवेतन देण्याच्या मागणीसाठी ईपीएस निवृत्तिवेतनधारकांनी मंगळवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. बीपीएल लाभार्थ्यांप्रमाणे सर्व सुविधा द्याव्यात, पेन्शनसह डीए देण्यासाठी भगतसिंह कोशारी अहवाल लागू करावा या मागण्यांसाठी ईपीएस निवृत्तिवेतनधारक कल्याण संघटनेच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना पंतप्रधानांच्या नावचे निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलताना ईपीएस निवृत्तिवेतनधारक कल्याण संघटनेचे राज्याध्यक्ष राजशेखर कोपर्डे यांनी, देशभरात भगतसिंह कोशारी अहवाल लागू करावा अशी मागणी केली. तसेच ईपीएस निवृत्तिवेतनधारकांना बीपीएल लाभार्थ्यांप्रमाणे सर्व सुविधा द्याव्यात, ईएसआय सुविधा द्यावी, डीए लागू करावा असा आग्रह त्यांनी केला. यावेळी ईपीएस निवृत्तिवेतनधारक कल्याण संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


Recent Comments