Belagavi

कन्नड आंदोलक पद्मराज वैजन्नावर यांचा सत्कार

Share

 कर्नाटक राज्योत्सवानिमित्त सन्मानित झालेल्या कन्नड आंदोलक पद्मराज वैजन्नावर यांचा बेळगावातील माणिकबाग दिगंबर जैन बोर्डिंगच्या वतीने मंगळवारी सत्कार करण्यात आला.

बेळगावातील जैन समाजाचे पद्मराज वैजन्नावर यांनी कन्नड भाषा व संस्कृतीच्या रक्षणासाठी योगदान दिले आहे. त्यानिमित्त नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय कर्नाटक राज्योत्सव दिन समारंभात सरकारतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला होता. यानिमित्त माणिकबाग दिगंबर जैन बोर्डिंगच्या वतीनेही पद्मराज वैजन्नावर व कन्नड आंदोलकांचा मंगळवारी सत्कार करण्यात आला. यावेळी बोर्डिंगचे अध्यक्ष पुष्पक हनमन्नावर, सचिव सन्मती कस्तुरी, दत्ता डोरले, अशोक जैन, संजय कुचनुरे, अप्पासाहेब चौगुले, रतन रामगौडा आदी उपस्थित होते.

 

 

Tags: