सूर्य–चंद्र असेतोवर अभिनेता अप्पू लोकांच्या स्मरणात राहतील असे गोकाकचे आ. रमेश जारकीहोळी यांनी सांगितले.

बेळगाव तालुक्यातील हुदली गावात शनिवारी अभनेता पुनीत राजकुमार याना श्रद्धांजली आणि अन्नदान कार्यक्रम पार पडला. त्यावेळी आ. रमेश जारकीहोळी बोलत होते. अभिनेता अप्पू यांच्या आठवणींनी भावुक होऊन बोलताना आ. जारकीहोळी म्हणाले, पुनीत राजकुमार इतक्या लहान वयात आपल्यातून गेले यावर विश्वास ठेवणे कठीण जात आहे. कमी वयाच्या पण एका महान अभिनेत्याला आपण मुकलो आहोत. त्यामुळे कन्नड चित्रपट सृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्याना मान देणं, आदर राखणं हा अप्पू यांचा मोठा गुण होता. सूर्य-चंद्र असेतोवर अभिनेता अप्पू लोकांच्या स्मरणात राहतील असे आ. जारकीहोळी म्हणाले. 


Recent Comments