Belagavi

‘लक्ष्य’ कन्नड चित्रपटाचा बेळगावात प्रीमिअर शो

Share

 कन्नड चित्रपटांचा प्रीमिअर शो बंगळुरात दाखवण्याच्या प्रथेला फाटा देतलक्ष्यया नव्या कन्नड चित्रपटाचा प्रीमिअर शो आज बेळगावात आयोजित केला होता.

रवी सासनूर लिखित, दिग्दर्शित ‘लक्ष्य’ या कौटुंबिक, रहस्यप्रधान व सत्य घटनेवर आधारित चित्रपटाचा प्रीमिअर शो रविवारी बेळगावातील ‘प्रकाश’ चित्रपटगृहात झाला. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण बेळगाव जिल्ह्यात केले आहे. येत्या १८ नोव्हेंबरला राज्यभरात तो पदर्शित होणार आहे. केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष व माजी राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे, ऍड. एन. आर. लातूर, राजीव दोड्डण्णावर यांच्यासह अनेक मान्यवरांनी या प्रीमिअर शोला हजेरी लावली.

यासंदर्भात बोलताना प्रभाकर कोरे व राजीव दोड्डण्णावर म्हणाले, चित्रपट प्रदर्शनाच्या संदर्भात उत्तर कर्नाटकात सुवर्णयुग सुरु झाले आहे. इतके दिवस बेंगळूर, चेन्नईत चित्रपटांचे प्रीमिअर होत. आता या चित्रपटाच्या निमित्ताने बेळगावात प्रीमिअर शो झाला आहे. यातून स्थानिक कलाकारांना संधी मिळेल. याचा या भागातील जनतेला आनंद झाला आहे.

‘लक्ष्य’चे दिग्दर्शक रवी सासनूर म्हणाले, ‘लक्ष्य’ हा एक सामाजिक आशयप्रधान चित्रपट असून, त्यात उत्तर कर्नाटकातील कलाकारांनी अभिनय केला आहे. प्रेक्षकांनी चित्रपट पाहून आम्हाला आशीर्वाद द्यावा.

अभिनेता संतोष झावरे म्हणाले, ‘लक्ष्य’चा प्रीमिअर आज बेळगावात होतोय. येत्या १८ नोव्हेंबरला राज्यभरात तो पदर्शित होणार आहे. रसिकांनी हा चित्रपट पाहून अभिप्राय द्यावा

एकंदर, ‘लक्ष्य’ चित्रपट पाहून कलाकारांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन चित्रपटाच्या कलाकारांनी केले आहे.

 

 

Tags: