विजापूर जिल्हा हा अनेक बाबींसाठी प्रसिद्ध आहे. यापैकीच एक म्हणजे सायकलिस्टसाठी. सायकलिस्टसचा जिल्हा म्हणून परिचित असलेल्या या जिल्ह्यातील सायकलपटू मात्र सध्या चिंतेत आहेत. आंतरराष्टीय स्तरावर सायकलिंगसाठी उत्तम कामगिरी केयी आहे. परंतु सध्या पुढील स्पर्धांसाठी आणि आव्हानांची तयारी करण्यासाठी सायकलपटूंना सरावासाठी वेलोड्रम ची व्यवस्था नाही. रस्त्यावर सायकलिंगचा सराव करायचा तर अपघाताची भीती… या साऱ्या अडचणी नजरेसमोर ठेऊन येथील सायकलपटू विजापूरमध्ये वेलोड्रम निर्मितीसाठी मागणी करत आहेत.

राज्यातील पहिल्या सायकलिंग वेलोड्रमची सुरुवात विजापूर जिल्ह्यात झाली होती. परंतु या वेलोड्रमला ग्रहण लागले असून या भागातील सायकलपटू आता विवंचनेत आले आहेत. विजापूर जिल्ह्यातील शहरी भागात भुतनाळ या प्रदेशात ८.१० एकर इतक्या विशाल परिसरात ७.३४ कोटी रुपयांच्या खर्चातून सायकलिंग वेलोड्रम कामकाज हाती घेण्यात आले होते. या कामकाजाला २०१५ मध्ये सुरुवात करण्यात आली. प्रारंभी वेलोड्रम कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर अचानकपणे अर्धवट स्थितीत हे कामकाज बंद पाडण्यात आले आहे. ८.३४ कोटी रुपयांच्या खर्चातील सुमारे ४ कोटी रुपये किमतीचे कामकाज पूर्ण झाले असून या चार कोटी रुपयांच्या कामकाजाची देयकेही अदा करण्यात आली आहेत. तर उर्वरित चार कोटी रुपये पाण्यात घातले का? असा संतप्त सवाल राज्य सायकलिंग संस्थेचे अध्यक्ष राजू बिरादार यांनी व्यक्त केला आहे.

सायकलिंग वेलोड्रम बांधकाम प्रक्रियेत तांत्रिक त्रुटी होत्या. यासाठी सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया च्या तज्ज्ञ समितीने २१ सप्टेंबर २०२१ रोजी येथे भेट देऊन पाहणी केली. या कामकाजाच्या त्रुटींसंदर्भात विस्तृत अहवाल जिल्हा प्रशासनाला देणे गरजेचे आहे. या समितीच्या अहवालावर वेलोड्रम चे कामकाज पुन्हा एकदा मार्गी लागेल. यासंदर्भात संबंधित अधिकारी, अभियंते आणि सदस्यांनी लक्ष पुरवून यातील समस्या सोडविण्याची मागणी सायकल्पातूननि केली आहे.
विजापूर जिल्ह्यातील सायकलपटूची प्रतिभा राष्टीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत आली आहे. यापुढील काळातदेखील विजापूर जिल्ह्याचे नाव उंचावण्यासाठी सदर वेलोड्रमचे कामकाज पूर्ण करून सायकलपटूंना सोय करून देण्याची मागणी करण्यात येत आहे.


Recent Comments