सर्व दानांत रक्तदान श्रेष्ठ दान मानले जाते. अग्निशामक दलाच्या जवानांनी केवळ आग विझवून लोकांचे जीव न वाचविता रक्तदान करूनही जीव वाचवण्यासाठी रक्तदान शिबीर घेतले हे प्रशंसनीय आहे असे उद्गार अग्निशामक दलाचे जिल्हा अधिकारी एस. एस. नीलगार यांनी काढले.
चिक्कोडी येथे अग्निशामक दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आयोजित केलेल्या स्वयंप्रेरित रक्तदान शिबिराच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते. आरोग्यपूर्ण राहण्यासाठी प्रत्येकाने वर्षातून किमान ३ वेळा रक्तदान केले पाहिजे. त्यामुळे अनेकांचा जीवही वाचतो असेही नीलगार यांनी सांगितले. यावेळी चिक्कोडी सरकारी इस्पितळाचे मुख्य वैद्याधिकारी डॉ. संतोष कोण्णूरे, आयडीएफसी बँकेचे अधिकारी महेश यांनीही यावेळी विचार मांडले. यावेळी बेळगाव ब्लड बँकेचे अधिकारी पाटील उपस्थित होते.



Recent Comments