Belagavi

कायदा आणि पर्यावरण संरक्षणाबाबत सायकल रॅली

Share

कायदा आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी बेळगावात गुरुवारी सायकल रॅली काढण्यात आली.

बेळगाव जिल्हा कायदा सेवा प्राधिकरण आणि बेळगाव वकील संघटनेच्या संयुक्त विध्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गुरुवारी बेळगाव शहरात कायदा साह्य आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी सायकल रॅली काढण्यात आली. जिल्हा कायदा सेवा प्राधिकरण कार्यालयासमोर मुख्य जिल्हा व सत्र न्या. चंद्रशेखर जोशी यांनी हिरवे निशाण दाखवून रॅलीला मार्गस्थ केले. त्यानंतर चन्नम्मा चौक, धर्मवीर संभाजी महाराज चौक, गोगटे चौक, मिलिटरी महादेव मंदिर आदी मार्गांवरून जात सावगाव येथील अंगडी तंत्रशिक्षण-व्यवस्थापन संस्थेच्या आवारात सायकल रॅली समाप्त झाली.

या संदर्भात पत्रकारांशी बोलताना मुख्य जिल्हा व सत्र न्या. चंद्रशेखर जोशी म्हणाले, कायदा सेवा प्राधिकरणांचा जनतेला कसा उपयोग होतो याबाबत जागृती करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर जनजागृती अभियान हाती घेण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणू बेळगावात आज सायकल रॅली काढण्यात आली आहे. जनतेने जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाकडून आवश्यक कायदेशीर मदत घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव विजय देवराज अरस, ऍड. एन. आर. लातूर, रोहित लातूर, लक्केश हेग्गन्नावर, यशवंत लमाणी, कर सल्लागार किरण नागलोटी, सायकलिंग कोच मरनूर यांच्यासह २५ हुन अधिक सायकलपटू रॅलीत सहभागी झाले होते.

 

 

 

Tags: