Gokak

आंबेडकर, टिपू सुलतान यांच्या छायाचित्रांची विटंबना

Share

गोकाक तालुक्यातील धुपदाळ येथील चन्नम्मानगरातील एका नामफलकावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि टिपू सुलतान यांच्या छायाचित्रांची अज्ञातांनी विटंबना केल्याची घटना घडली. याच्या निषेधार्थ विविध दलित संघटनांनी जय कर्नाटक संघाच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली.  

घटप्रभा=धुपदाळ रस्त्यावर निदर्शक कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून वाहतूक अडवली. छायाचित्रांची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना तत्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना दलित नेते संतोष दोडमनी म्हणाले, आमच्याकडे बाबासाहेबांची लेखणी आणि टिपूची तलवार दोन्ही आहे. हे समाजकंटकांनी लक्षात ठेवावे. यापुढे याची पुनरावृत्ती झाल्यास आणखी एक भीमा कोरेगाव झाल्याशिवाय राहणार नाही याची समाजकंटकांनी नोंद घ्यावी असा इशारा दिला.  या निदर्शनामुळे रस्त्यावर सुमारे अर्धा किमी लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर विटंबना केलेल्या समाजकंटकांच्या अटकेसाठी पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

 

Tags: