Gokak

गोकाक येथे विद्यार्थ्यांचे बससाठी आंदोलन

Share

राज्यभरातील शाळांना नुकतीच सुरुवात झाली आहे. जवळपास सर्व विभागातील शाळा महाविद्यालयांना सुरुवात झाली असून शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थितीही वाढत आहे. तर दुसऱ्या बाजूला शाळेला येण्यासाठी विद्यार्थ्यांना बससेवेमुळे अडचणी निर्माण होत आहेत. अपुऱ्या बससेवेमुळे आज गोकाक तालुक्यातील कोण्णूर येथे विद्यार्थ्यांनी रास्तारोको केला.

बस सुविधा योग्य पद्धतीने मिळत नसल्याकारणाने आज गोकाक तालुक्यातील कोण्णूर येथे विद्यार्थ्यांनी रस्ता रोको केला. कोन्नूरपासून गोकाक पर्यंत जाण्यासाठी योग्य बससेवा पुरविण्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. गोकाक डेपो मॅनेजरला निवेदन देण्यासाठी अधिकारी टाळाटाळ करत असून गुरुवारी याविरोधात कोण्णूर परिसरातील केएसआरटीसी बस सहित सर्व वाहनांना रोखून रास्ता रोको करत आंदोलन छेडण्यात आले.

सदर आंदोलन सलग तीन ते चार तास अशाचपद्धतीने सुरु ठेवल्याने आंदोलनस्थळी गोकाक मॅनेजर पोहोचले. यावेळी विद्यार्थ्यांनी अधिकच आक्रोश व्यक्त केला. विद्यार्थ्यांसह नागरिकांनीही आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी आंदोलनातील विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले.

शाळा महाविद्यालयांना प्रारंभ झाला असून सरकारने केएसआरटीसी व्यवस्थापनाशी सल्ला मसलत करून बससेवा सुरळीत करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Tags: