भूतरामहट्टी गावातील वाल्मिकी युवा संघ आणि महिला संघाच्या वतीने आज महर्षी वाल्मिकी जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्याहस्ते पार पडले. जयंतीचे औचित्य साधून वंटमुरी ते भूतरामहट्टी पर्यंत भव्य बाईक रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या उदघाटनानंतर बोलताना राहुल जारकीहोळी म्हणाले, महर्षी वाल्मिकी हे ज्ञानाचे आगार असून रामायणाच्या माध्यमातून साऱ्या जगाला ज्ञानाची नवी दुनिया मिळाली आहे. वाल्मिकींनी रचलेल्या महाकाव्यात जनतेच्या सर्व समस्या, संकटे, आव्हाने यांचे उत्तराचे. या महाकाव्यातून बंधुत्व, मानवतावादी गुणांसह चांगल्या समाजाची निर्मिती करणे शक्य आहे, असे मत राहुल जारकीहोळी यांनी व्यक्त केले. 
राहुल जारकीहोळी पुढे म्हणाले, समाजातील सर्व बांधवांनी आपल्या मुलांना वाल्मीकींच्या जीवनाबद्दल सांगावे. मुलांना चांगले शिक्षण देऊन आर्थिक आणि सामाजिक विकास साधने शक्य आहे. मुलांचे भविष्य घडवण्याच्या दिशेने कार्यरत राहून सरकारने दिलेल्या सुविधांचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. वंचित असलेल्या जनतेला राजकीयदृष्ट्या प्रवृत्त करणे, शैक्षणिक आरक्षण देणे, रोजगार मिळवून देणे आवश्यक असल्याचे मत राहुल जारकीहोळी यांनी व्यक्त केले. वाल्मिकी हे एका समाजापुरते मर्यादित नसून सर्व समाजाने त्यांचे आदर्श स्वीकारावे, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला सिद्धू सुनगार, यल्लाप्पा बुद्री, भीमगौडा पाटील, सुनील सुनगार, विजय वनमनी, महादेवी चौगुला, बिमराई नाईक, बाळकृष्ण पाटील, रवींद्र नायकर, शिवराई पाटील, मुशप्पा पाटील, सुरेश नाईक, दयानंद पाटील, रामण्णा गुळ्ळी, बिमराई कटबाळी, सन्नाप्पा कटबाळी, परसप्पा कटबाळी, नागाप्पा नायक यांच्यासह इतर नेते आणि आसपासच्या गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भूतरामहट्टी वाल्मिकी संघाच्या वतीने वंटमुरी ते भूतरामहट्टी पर्यंत भव्य बाईक रॅली काढण्यात आली. युवा नेते राहुल जारकीहोळी यांनी रॅलीला चालना दिली. राहुल जारकीहोळी हे जीपमधून या बाईक रॅलीत दाखल झाले. त्यांच्या मागोमाग शेकडो युवक बाईक रॅलीत सहभागी झाले. या बाईक रॅलीच्या माध्यमातून महर्षी वाल्मिकींचा जयजयकार करण्यात आला. यावेळी रस्त्याशेजारी शेकडो नागरिकांनी थांबून रॅली पहिली.


Recent Comments