Chikkodi

केरूर ते केम्पट्टी, मिरज रस्त्याच्या कामाला चालना

Share

 चिक्कोडी मतदारसंघातील केरूर गावात .११ कोटी रुपये खर्चाच्या रस्तकामाला . गणेश हुक्केरी यांनी भूमिपूजन करून चालना दिली.

कोरोना महामारीमुळे अनेक विकासकामे ठप्प झाली होती. मात्र आ. गणेश हुक्केरी आणि माजी खा. प्रकाश हुक्केरी यांच्या प्रयत्नाने चिक्कोडी-सदलगा मतदार संघात अनेक विकासकामांना प्रारंभ करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी २ रस्त्यांच्या कामना प्रारंभ करण्यात आला. केरूर ते केम्पट्टी या २ कोटी रु खर्चाच्या रस्त्याच्या आणि केरूर ते मिरज मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या १.११ कोटी रु खर्चाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपुजन आ. गणेश हुक्केरी यांच्याहस्ते करून कामाला चालना देण्यात आली. 

यावेळी बोलताना आ. गणेश हुक्केरी म्हणाले, केरूर ते केम्पट्टी आणि केरूर ते मिरज मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याचे दुरुस्ती काम करण्याची येथील जनतेची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. त्यामुळे या कामाला मंजुरी मिळवून प्रारंभ करण्यात आला आहे. चिक्कोडी-सदलगा मतदार संघात कोणतीही विकासकामे प्रलंबित राहणार नाहीत याची काळजी घेण्यात येईल. सरकारची आर्थिक स्थिती चांगली नाही. तरीही मी आणि माजी खा प्रकाश हुक्केरी यांनी सरकारदरबारी प्रयत्न करून अधिक निधी मंजूर करवून घेऊन विकासकामे राबवित आहोत असे आ. गणेश हुक्केरी यांनी सांगितले.

यानंतर बोलताना ग्रामस्थ मंजुनाथ म्हणाले, केरूर ते केम्पट्टी रस्त्याची गेल्या २-३ वर्षांपासून मोठी दुरवस्था झाली होती. त्यामुळे त्याच्या दुरुस्तीची विनंती ग्रामस्थांनी आ. गणेश हुक्केरी याना भेटून केली होती. त्याची दखल घेऊन त्यांनी हे काम सुरु केल्याने समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी विठ्ठल वाळके, मल्लिकार्जुन पाटील, संतोष वड्डर, मल्लप्पा बागी, वीरेंद्र पाटील, महेश पाटील, रवी पाटील, वसंत नेजकर, चिदानंद माळी, खानू बाडकर, सुरेश बाडकर, बी. डी. पाटील, अजित कुंबार आदी उपस्थित होते.

 

 

Tags: