Chikkodi

कामांध युवकाने केला दुसऱ्या युवकावर अत्याचार

Share

 एका कामांध युवकाने दुसऱ्या युवकावर अत्याचार केल्याची लाजिरवाणी घटना बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात घडली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात एक किळसवाणी विचित्र घटना समोर आली आहे. यात एका कामांध युवकाने दुसऱ्या युवकावर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. बसच्या प्रतीक्षेत थांबलेल्या एका युवकाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मोटरसायकलवर बसवून निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केल्याची तक्रार पीडित युवकाने पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. या संदर्भात अथणी पोलिसांनी पीडित युवकाची तक्रार स्वीकारून गुन्हा नोंद केला आहे. अत्याचार केलेल्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, एका युवकावर दुसऱ्या कामांध समलैंगिक युवकाने अत्याचार केल्याचे हे प्रकरण राज्यात गाजत आहे. त्याच्या या कृत्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे.

 

Tags: