पेट्रोल–डिझेलसह इंधन, जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या विरोधात आधी बैलगाडी जत्था, सायकल जत्था काढलेल्या काँग्रेसने विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी चक्क टांगा जत्था काढून दरवाढीविरोधात अभिनव आंदोलन केले.

होय, विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी सकाळी ९ वाजता काँग्रेस कार्यकर्त्यांनी दरवाढीविरोधात पक्ष कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर सकाळी १० च्या सुमारास विरोधी पक्षनेते सिद्रामय्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते एस. आर. पाटील यांनी केपीसीसी कचेरीपासून विधानसौधकडे टांग्यातून कूच केले.
त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते चालत निघाले. मार्गावर भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकार दरवाढ कमी करण्यात अपयशी ठरले आहे. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वसामान्य लोकांवर सरकारने करवाढीचा बोजा लादला आहे. यातून भाजप सरकार जनविरोधी धोरण राबवत आहे असा आरोप काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांनी यावेळी केला.
Recent Comments