पंचमसाली समाजाला २अ श्रेणीत समाविष्ट करुन आरक्षण देण्यात यावे, यासाठी आंदोलन करण्यात येत असून, सरकारला आरक्षण जाहीर करण्यासाठी दिलेली मुदत संपली आहे. दिलेल्या मुदतीपर्यंत सरकारने आरक्षण जाहीर केले तर मुख्यमंत्र्यांचा खडीसाखरेने तुलाभार करण्यात येईल, असे वक्तव्य पंचमसाली समाजाचे कुडलसंगम पिठाचे बसव मृत्युंजय स्वामी यांनी केले आहे.

राज्यात पंचमसाली समाजाच्यावतीने आरक्षणासाठी आंदोलन करण्यात येत असून सध्या हा समाज आंदोलनाच्या पाचव्या टप्प्याकडे मार्गस्थ होत आहे. पंचमसाली समाजाला २ए श्रेणीत समाविष्ट करुन आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली असून यासंदर्भात चिकोडी येथे कुडलसंगम पिठाचे बसव मृत्युंजय स्वामी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले कि, राज्यात पंचमसाली समाज आरक्षण मिळविण्यासाठी आंदोलन करत आहे. या समाजाला २ए या श्रेणीत समाविष्ट करण्यात यावे यासाठी सातत्याने मागणी करण्यात येत आहे. आतापर्यंत चार टप्प्यात आंदोलन करण्यात आले. सरकारने आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी सरकारला मुदत दिली होती. परंतु अद्याप आरक्षण जाहीर करण्यात आले नाही. जर सरकारने आरक्षणाची घोषणा केली नाही, तर १ ऑकटोबरपासून पाचव्या टप्प्यातील आंदोलनाला सुरुवात करण्यात येईल, असे मृत्युंजय स्वामी म्हणाले.
ते पूढे म्हणाले कि, पंचमसाली प्रतिज्ञा पंचायत १ ऑक्टोबर पासून बंगळूरमध्ये घेण्यात येईल. तोपर्यंत सरकारने जर आरक्षण घोषित केले तर समाज सरकारच्या सन्मानार्थ मुख्यमंत्री बोम्मई यांचा खडीसाखरेने तुलाभार करेल. एखाद्यावेळेस आरक्षण जाहीर करण्यात आले नाही, तर आंदोलन पुढे तसेच सुरु ठेवण्यात येईल, असे बसव मृत्युंजय स्वामी म्हणाले.


Recent Comments