Gokak

सशस्त्र चोरट्यांचा गोकाकमध्ये वावर

Share

 हातात लाठ्या आणि अन्य शस्त्रास्त्रे घेऊन रस्त्यावर बिनधास्तपणे चोरट्यांनी टोळी फिरत असल्याची धक्कादायक घटना गोकाक शहरात उघडकीस आली आहे. याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाले असून त्यामुळे सर्वाना धक्का बसला आहे.

होय, गोकाक शहरातील किल्ला आणि आवटी गल्ली परिसरात सशस्त्र चोरट्यांचा सहज वावर होत असल्याचे उघडकीस आले आहे. याआधी गोकाकमधील विवेकानंद नगरात चोरट्यांचा उपद्रव वाढला होता. त्यावेळी गोकाक शहर पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनांची नोंदही झाली होती. मात्र त्यानंतर आता काल रात्री शहरातील किल्ला आणि आवटी गल्लीतही सशस्त्र चोरट्यांचा वावर होत असल्याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाल्याने खळबळ उडाली आहे.

अनेक घरांवर चोरटयांनी नजर ठेवल्याने येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा तातडीने शोध लावून त्यांना गजाआड करावे अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

 

Tags: