COVID-19

‘व्हॅक्सिनेट इंडिया’चे उपराष्ट्रपतींच्या हस्ते उदघाटन 

Share

 केंद्र सरकार, गिव्ह इंडिया आणि विविध खात्यांच्या वतीने बेंगळुरात आयोजित व्हॅक्सिनेट इंडिया कार्यक्रमाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी मंगळवारी उदघाटन केले.

मंगळवारी राजभवनात आयोजित कार्यक्रमात २ महिलांना सांकेतिकरीत्या लस देऊन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्हॅक्सिनेट इंडिया या लसीकरण कार्यक्रमाचे उदघाटन केले. त्यानंतर बोलताना त्यांनी, जनतेने कोविड मार्गसूचीचे काटेकोर पालन करत मास्क वापरून सामाजिक अंतर पाळण्याचा व सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला दिला. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लशीला दुसरा पर्याय नाही. त्यामुळे न विसरता सर्वानी लस घ्यावी, जंक फूड न खाता भारतीय आहारच घ्यावा असे आवाहन केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, गरीब, तळागाळातील लोकांना लस देणे हा आमचा उद्देश आहे. त्यामुळेच कोरोनाशी लढण्याची शक्ती मिळेल. दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी सीएसआर निधीतून सर्वाना लस देण्यासाठी पुढे यावे. सरकार आणि समाजाने एकत्रित लढा दिल्यासच कोरोनाचा सामना करता येईल असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी राज्यपाल थावरचंद गेहलोत, आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर, मुनिरत्न, खा. पी. सी. मोहन आदी उपस्थित होते.

 

Tags: