कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढला आहे. सण–उत्सव साजरे करताना खबरदारी घ्या. लशीचे दोन्ही डोस घेईपर्यंत काळजी घ्या असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी राज्यातील जनतेला केले.
: बेंगळुरातील देवनहळ्ळी येथे गुरुवारी पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री सुधाकर म्हणाले, देशात व राज्यात कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढला आहे. त्यामुळे सण-उत्सव साजरे करताना लोकांनी गर्दी करू नये, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळून सर्व खबरदारी घ्यावी. कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस मिळेपर्यंत तरी आवश्यक काळजी घ्यावी असे आवाहन केले.
राज्यात शाळा सुरु करण्यासंदर्भातही सरकारने मार्गसूची जारी केली आहे. मुलांची सर्वप्रकारे योग्य काळजी घेण्याच्या सूचना शिक्षण खात्याकरवी सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत. मुलांचे आरोग्य आणि जीव हे दोन्ही वाचविण्याचा सरकारचा उद्देश आहे.
एकंदर, लोकांनी लशीचे दोन्ही डोस मिळेपर्यंत तरी आवश्यक काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी केले.
Recent Comments