COVID-19

पैसे घेऊन निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्यांवर कडक कारवाई : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

Share

 राज्यात पैसे घेऊन कोविड निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे असे रिपोर्ट घेतलेल्यांची पुन्हा चाचणी करण्यात येईल असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

हेब्बाळ मतदारसंघातील भाजपच्या सर्व शाखांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री बोम्मई यांची भेट घेऊन कन्नड पुस्तके देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच हेब्बाळ मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. फ्लो निवेदन स्वीकारून बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, हेब्बाळ मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. आज ४ खात्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार आहे. सकाळी उच्च शिक्षण आणि बांधकाम खाते सायंकाळी गृहनिर्माण खात्याची बैठक घेणार आहे. राज्याची वेगाने प्रगती करण्याचा सरकारचा उद्देश आहे. गरिबांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने योजना हाती घेतल्या आहेत. स्वातंत्र्यदिनी घोषित केलेल्या अमृत योजनांची त्वरित अमलबजावणी करण्यासाठी मुख्य सचिवांना सूचना केली आहे. त्यावर त्यांनी कामही सुरु केले आहे.

तमिळनाडूप्रमाणे कर्नाटकात पेट्रोल दरात कपात केली जाणार नसल्याचे मुहयमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. पैसे घेऊन कोविड चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट देणारे रॅकेट राज्यात कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. असा रिपोर्ट मिळवलेल्यांची कोरोना चाचणी करण्यात येईल असे ते म्हणाले. यावेळी माजी मंत्री कट्टा सुब्रमण्यम नायडू, आ. नारायणस्वामी आदी उपस्थित होते.

 

 

 

Tags: