बेळगावच्या बीम्स (BIMS) मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस शिकणारा एक विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झाला असून, ही घटना काळजीचा विषय ठरत आहे.

कोडगू जिल्ह्यातील अॅलन कृष्णा (वय १९) हा विद्यार्थी बीम्समध्ये एमबीबीएस शिक्षण घेत आहे. २४ एप्रिलपासून तो वसतिगृहातून बेपत्ता असून त्याची कोणतीही ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही. त्याच्या वडिलांनी एपीएमसी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे.
या विद्यार्थ्याबद्दल कोणालाही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ एपीएमसी पोलिस ठाणे (0831-2405250) किंवा ससी व्ही.के. (9480290450) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Recent Comments