खानापूर तालुक्यातील मौजे डोगरगांव या गावात श्री रवळनाथ मंदिराचा कळसारोहण समारंभ उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास समाजसेवक अमृत शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना त्यांनी, मंदिरांचे दर्शन घेऊन धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे सांगितले.
यावेळी श्री सत्यनारायण पूजा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी डोगरगांव मठाधीश भयकर महाराज यांच्यासह ग्रामस्थ आणि भाविक उपस्थित होते.
Recent Comments