Bagalkot

बागलकोट : पंचमसाली ट्रस्टच्या नेतृत्वावरून काशप्पनवर विरुद्ध जय मृत्युंजय स्वामीजी संघर्ष शिगेला!

Share

पंचमसाली लिंगायत समाजाच्या कूडलसंगम पंचमसाली ट्रस्टच्या अध्यक्षपदावरून उद्भवलेला संघर्ष आता उधाणावर आला आहे. हुनगुंदचे आमदार विजयानंद काशप्पनवर यांची नुकतीच या ट्रस्टच्या अध्यक्षपदी एकमुखाने निवड करण्यात आली असून, त्यामुळे जय मृत्युंजय स्वामीजी आणि काशप्पनवर यांच्यातील संघर्ष अधिकच उफाळला आहे.

गुरुवारी हुबळीतील एका खासगी हॉटेलमध्ये झालेल्या बैठकित, ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष प्रबण्णा हुणसिकट्टी यांनी राजीनामा दिल्यानंतर, ट्रस्टमधील ३४ सदस्यांनी विजयानंद काशप्पनवर यांची एकमताने अध्यक्षपदी निवड केली. या निवडीमुळे पंचमसाली पंथाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कूडलसंगममधील पंचमसाली पीठाचं अस्तित्व, त्याचे मार्गदर्शन आणि प्रतिनिधित्व यावरून मोठा वाद पेटला आहे.

आता परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. एप्रिल १९ रोजी विजयानंद काशप्पनवर यांच्या नेतृत्वाखाली ट्रस्टतर्फे महत्वाची सभा घेण्यात येणार आहे. त्याचवेळी एप्रिल २० रोजी जय मृत्युंजय स्वामीजी यांनी स्वतःची सभा बोलावली आहे. या दोघांमधील संघर्ष कोणत्या टप्प्यापर्यंत पोहचतो, आणि पंचमसाली समाजाच्या एकतेवर याचा काय परिणाम होतो, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Tags: