Belagavi

बेळगावात भीषण आग; दोडवाड येथे २० हून अधिक गवतगंज्या जळून खाक

Share

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील दोडवाड गावात आज सकाळी अचानक लागलेल्या आगीत २० हून अधिक गवतगंज्या जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

दोडवाड गावाच्या हद्दीतील तलावाशेजारी असलेल्या माळरानावर शेतकऱ्यांनी गवतगंज्या साठवून ठेवल्या होत्या. अचानक लागलेल्या आगीत काही क्षणांतच २० हून अधिक गवतगंज्या भस्मसात झाल्या. आगीमुळे परिसरात घनदाट धुराचे लोट पसरले होते.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटना दोडवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Tags: