मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी आग्रही मागणी करुनाडू रक्षण वेदिकाच्या वतीने करण्यात आली आहे.

मायक्रो फायनान्सच्या जाचापासून मुक्ती द्या… अशी मागणी करीत हुक्केरी तालुक्यातील महिलांच्या कडून बेळगावात निदर्शने करण्यात आली. करूनाडू रक्षणा वेदिकेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले.
मायक्रो फायनान्स च्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
हुक्केरी तालुक्यातील काही गावातून मायक्रो फायनान्सचे कर्मचारी कर्ज वसुलीसाठी महिलांना नाहक त्रास देत आहेत. अशा या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करुनाडू रक्षण वेदिकेच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी आंदोलन करण्यात आले.
बनावट कागदपत्रे तयार करून मायक्रो फायनान्स चे कर्मचारी हुक्केरी तालुक्यातील बसापूर, हागेदाळ कट्टाबळी गावातील महिलांना कर्ज वसुलीच्या नावाखाली नाहक त्रास देत आहेत. अशा मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्यांचा त्वरित बंदोबस्त करावा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करुनाडू रक्षण वेदिकेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या त्रासाबद्दल इन न्यूज शी बोलताना एका महिलेने कर्मचाऱ्यांच्या जाचाचा पाढा वाचला. आंदोलनात भाग घेतलेल्या प्रगती नामक महिने ने प्रतिक्रिया व्यक्त करताना मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्यांकडून कसा त्रास दिला जात आहे याची माहिती दिली.
मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त करावा त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी करुनाडू रक्षण वेदिकेचे राज्याध्यक्ष मल्लिकार्जुन मुरकुंबी, उत्तर कर्नाटक घटकाचे अध्यक्ष मंजुनाथ जल्ली यासह अन्य पदाधिकारी आणि हुक्केरी तालुक्यातील महिला बहूसंख्येने उपस्थित होत्या
Recent Comments