Uncategorized

विजापूर जिल्ह्यात हालगीवादन स्पर्धा हलगीच्या तालावर झाले साहसी खेळांचे प्रदर्शन

Share

आजच्या धकाधकीच्या जीवनात सांस्कृतिक लोक कला लोप पावत चालली असली तरी ग्रामीण भागामध्ये मात्र लोककलेला पुनरुज्जीवित करण्याचे प्रामाणिक प्रयत्न होताना दिसत आहेत. याच अनुषंगाने विजयपूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी येथे होलिकोत्सवाचे औचित्य साधून श्री बसवेश्वर सेवा समितीच्यावतीने हलगी वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

वैयक्तिक आणि सांघिक हलगी वादन अशा दोन गटात ही स्पर्धा घेतली गेली. स्पर्धेत देवर हिप्परगी, ताळीकोटे यासह विजयपूर जिल्ह्यातील विविध ठिकाणचे हालगीवादक सहभागी झाले होते. तहसीलदार वाय.एस.सोमनकट्टी व डीवायएसपी बाळप्पा नंदगावी यांनी दमदार हालगी वाजवून स्पर्धेला चालना दिली.

या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय अशा तीन विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
हालगीच्या तालावर विविध मर्दानी खेळांचे सादरीकरण करून स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या. हलगी वादन स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी शिट्ट्या व टाळ्या वाजवून वातावरणात रंगत निर्माण केली होती.

ग्रामीण भागातील सांस्कृतिक लोक कला जोपासण्याचे काम आजही काही संघ संस्था करीत आहे ही प्रशासकीय बाब आहे, असे बसवनबागेवाडी विरक्तमठाचे श्री सिद्धलिंग महास्वामीजी यावेळी बोलताना म्हणाले

 

Tags: