बेळगाव : बेळगावी ग्रामीण मतदारसंघातील बस्तवाड गावात पाणी व्यवस्थापन घटक निर्माण कामाला युवा काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते भूमिपूजन करून चालना देण्यात आली.

बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या आमदार व राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून सुमारे 4.48 कोटी रुपये खर्चाचे हे विकास काम हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या माध्यमातून गावातील सांडपाणी जल व्यवस्थापन युनिटकडे हस्तांतरित करून ते पाणी फिल्टर करून शेतकऱ्यांच्या शेतात सोडण्याचे उद्दिष्ट आहे. गावातील स्वच्छतेबरोबरच शेती पिकविण्यासाठी हा प्रकल्प उपकारक ठरणार आहे.
यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा शिल्पा प. पाटील, उपाध्यक्ष विठ्ठल सांबरेकर, मनोहर मुचंडी, तवनप्पा बडिगेर, भरमप्पा गौडकेंचप्पगोळ, रामा काकतकर, ज्योतिबा चौगुले, समीर सनदी, लक्ष्मी सांबरेकर, अर्जुन पाटील, रमेश हुनशिमरद, मनोहर बांडगी, बाळाराम पाटील, शिवाजी काकतकर, इराप्पा चौगुले, गुंडू पाटील, महावीर संकेश्वरी, पद्मराज पाटील, भरतेश संकेश्वरी, देवप्पा बडवन्नवर, अशोक जक्कन्नवर, बशीरसाब किल्लेदार, मेहबूब मुल्ला, कृष्णा कोलकार, माणिक्य कोलकार, महांतेश हिरेमठ, सागर तहशिलदार, डी. एम. बन्नूर, श्वेता डी. आर, पीडीओ, ठेकेदार यासह गावातील अनेकजण उपस्थित होते.
Recent Comments